अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण रोडवरील एका हॉटेलमधील वेटरने शेजारी राहणाऱ्या ६० वर्षीय महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
पुईफाट्याजवळ असलेल्या हॉटेलमधील वेटरने मद्यपान करून १२ ऑक्टोबरला रात्री ११ च्या सुमारास महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ‘आवाज केला तर तुला जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकी त्याने दिली.
महिला अोरडत तेथून पळत काही अंतरावर असलेल्या आपल्या मुलीच्या घराकडे गेली. त्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन वेटर पळून गेला.
त्या महिलेने घडलेला प्रकार इतरांना सांगितला. त्या वेटरला शोधण्याचा प्रयत्न सर्वांनी केली, पण तो सापडला नाही. सकाळी नातेवाईकांसह महिलेने श्रीगोंदे पोलिस ठाण्यात वेटर विरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved