अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- के.के. रेंजच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर कुणी राजकारण करत असेल तर त्याला आपण माफ करणार नसल्याचा इशारा देत येत्या पाच वर्षात हा प्रश्न कायमस्वरूपीचा मार्गी लावण्याचे आश्वासन देत समितीच्या मागणीचे निवेदन लोकसभेच्या येत्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे.
वेळप्रसंगी याच प्रश्नावर न्यायालयात देखील जाण्याची आपली तयारी असल्याचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी सांगितले. के. के. रेंज प्रश्न शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आज डॉ. विखे यांनी बाधित गावातील पाच गावांचा दौरा केला.
ढवळपुरी येथे त्यांनी शेतकऱ्यांची संवाद साधला. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे,भाजपाचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, राहुल शिंदे, सरपंच डॉ.राजेश भनगडे यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार विखे म्हणाले की, याप्रश्नी आपण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व लष्करप्रमुखांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे.
देशाचे संरक्षण देखील महत्त्वाचे आहे परंतु शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय केंद्र सरकार व लष्कराने कोणताही निर्णय घेऊ नये अशी स्पष्ट भूमिका आपण त्यांच्याकडे मांडली आहे.
राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल बोलताना खासदार विखे म्हणाले की केंद्र सरकारने राज्य सरकारला याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार केला.
सहा हजार 800 कोटी मूल्यांकन असणारी जमीन केंद्राने राज्याला दिली मात्र राज्याने शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारची भरपाई दिली नाही असे सांगत खासदार विखे म्हणाले की
याप्रश्नी गाव पातळीवरील सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकऱ्यांची समिती तयार करावी, या समितीचे निवेदन आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार आहोत.
शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना नेमकी जमीन हवी की चांगला मोबदला हवा ? यासंदर्भात त्यांची मते जाणून घेणार आहोत. या प्रश्नावर आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत.
1958 सालापासून हा प्रश्न प्रलंबित आहे परंतु काही मंडळी केवळ राजकीय आकसापोटी फडणीस सरकारवर दोष देत आहेत या प्रश्नावर अशा प्रकारचे आरोप-प्रत्यारोप करणाऱ्यांना आपण माफ करणार नसल्याचेही खा.विखे यांनी सांगितले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved