अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काल रात्री शनी शिंगणापुरच्या मंदीरात शनी देवाचा अभिषेक केला.
करुणा शर्मा यांच्यासोबतचा लिव्ह इनचा वाद परस्पर सहमतीनं मिटवण्यासाठी एका मध्यस्थाची नेमणूक करण्यात आली आहे. तो वाद मिटेल अशी आशा केली जात असतानाच धनंजय मुंडे आज शनी शिंगणापुरात पोहोचले.
शिंगणापुरात शनी देवाला अभिषेक केल्यानंतर धनंजय मुंडेंमागची साडे साती संपलीय की संपावी म्हणून त्यांनी अभिषेक केला, याची जोरदार चर्चा रंगली आहे.
धनंजय मुंडे जिथं जातील तिथं त्यांचं जोरदार स्वागत होत आहे. आधी बीड आणि आज नगरमध्ये जिथंही मुंडे गेले तिथं त्यांचं स्वागत केलं गेलं. जेसीबीतून गुलालाची उधळण केली गेली. धनंजय मुंडे तुम आगे बढोच्या लोकांनी घोषणा दिल्या