अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- पोलिस निरीक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिलेची काहीजणांच्या मध्यस्थीनंतर पोलीस निरीक्षकासोबत तडजोड झाली.
प्रकरणात मिटवामिटवी झाल्यानंतर पोलिस निरीक्षकाने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे.
पोलीस निरीक्षकावर एका महिलेने शारीरिक अत्याचार करून गर्भपात केल्याचा आरोप केला होता. याबाबतची पोस्ट सदर महिलेने स्वतःच्या फेसबुक अकाउंटवर टाकली होती.
ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करून पुन्हा ‘फेसबुक’वरून डिलीट करण्यात आली होती.
पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल होईल, या भीतीने त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
त्यानंतर काही जणांनी मध्यस्थी केली. पोलीस निरीक्षक व त्या महिलेची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत मध्यस्थांच्या प्रयत्नानंतर मिटवामिटवी केली.
त्यांच्यात तडजोड झाल्यानंतर महिलेने गुन्हा दाखल न करण्याचा शब्द दिला व त्यानंतर सदर अधिकाऱ्यांनी अर्ज माघारी घेतला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com