काय झाल शेवटच्या अर्ध्या तासात निर्भायाच्या आरोपींसोबत ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- चारही दोषींना 20 मार्च 2020 रोजी पहाटे 5.30 वाजता फाशी दिली गेली. फाशी देण्यापूर्वी अर्धा तास हे खूप महत्वाचे होते. यावेळी दोषींनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. ते ओरडले, उशीरापर्यंत हँगिंग रुममध्ये बसले होते. पण शेवटी संपूर्ण देश त्यांच्या मृत्यूची वाट पाहत होता.

फाशी घरात पोहोचल्यावर चारही दोषींनी रडारड केली, बचावासाठी फाशी घरातील लादीवर लोळण्याचाही प्रयत्न केला. मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह या चारही आरोपींना फासावर लटकवण्यात आले.

तिहार तुरुंगात एकाचवेळी चार जणांना फासावर चढविण्याची ही पहिलीच घटना ठरली. चारही दोषींना एकाचवेळी फासावर लटकवण्यात आले. त्यासाठी तिहारच्या तुरुंगाच्या क्रमांक तीनच्या फाशी घरात चार हँगर बनवण्यात आले होते.

यातील एक खटका (लीवर) मेरठहून आलेल्या जल्लाद पवनने खेचला, त्यापूर्वी पहाटे 3.15 वाजता चौघांना उठवण्यात आले, पण त्यांच्यातील कोणीही झोपलं नव्हतं. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना आंघोळ करण्यास सांगण्यात आले.

नंतर, चहा मागवण्यात आला आणि अखेरची इच्छा विचारली. सेलच्या बाहेर आणण्याआधी चौघांनाही पांढरे कपडे घालण्यात आले. चौघांचे हात मागे बांधण्यात आले होते, यावेळी दोघा दोषींनी हात बांधण्यास विरोध करण्याचाही प्रयत्न केला.

फाशी घरात घेवून जात असताना एक दोषी प्रचंड घाबरला आणि तिथेच लोळून राहिला…त्याने पुढे जाण्यास नकार दिला. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर त्याला नेण्यात आले. नंतर चौघांचेही चेहरे काळ्या कपड्याने झाकण्यात आले.

निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यासाठी पवन जल्लाद हे एक दिवस आधीच मेरठ वरून दिल्लीच्या तिहार तुरूंगात पोहोचले होते. त्यांनी सकाळी ठीक ५.३० वाजता या आरोपींना फाशी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24