ब्रेकिंग

अहमदनगर भाजपमध्ये नक्की चाललंय तरी काय ? मंत्री राधाकृष्ण विखेंच्या विरोधात थेट भाजप युवानेता निवडणूक लढवणार ???

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण तस पाहिलं तर बेरकीच. दक्षिणेत सोयऱ्या धायऱ्यांचे राजकारण आणि उत्तरेत विखे घराण्याचे वर्चस्व हे समीकरण शक्यतो सर्वाना माहित आहे.

विखेंनी ठरवलं तर ते आपल्या पक्षातील असला तरी त्याला पडतातच असं म्हटलं जातात व तसा आरोप मागील विधानसभेच्या निकालानंतर अनेक भाजप आमदारांनी केलाच होता.

अगदी आ. राम शिंदे असोत की माजी आ. स्नेहलता कोल्हे असोत. परंतु आता हा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागलेलं दिसतोय. याचे कारण म्हणजे आ. राम शिंदे हे सरळ सरळ विखे याना विरोध करत आहेत.

व आता विवेक कोल्हे तर थेट विखेंच्या बालेकिल्ल्यात शिरत निवडणूक जिंकत आहेत. त्यामुळे भाजपमध्येच विखेंना विरोधक तयार झालेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

विवेक कोल्हे मंत्री विखेंच्या विरोधात लढणार ?

भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा पराभव विखेंमुळे झाल्याचा विवेक कोल्हे यांनी पुनरुच्चार केला आहे.त्यामुळे आता याचा वचपा काढण्यासाठी विवेक कोल्हे हे मंत्री विखेंच्या विरोधात निवडणूक लढवणार असं म्हटलं जात आहे.

यामुळे जिल्ह्यात नेमकं काय घडतंय असा प्रश्न पडलाय. परंतु आता या सर्व निरर्थक चर्चा आहेत.आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आणि पक्ष बळकट करण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे असं स्वतः विवेक कोल्हे यांनी म्हटल आहे.

जिल्ह्यात आगामी लोकसभेची जोरदार तयारी

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आता कम्बर कसली आहे. निवडणुका केव्हा जाहीर होतील,आणि कधी सगळी धावपळ सुरु होईल, अशी घालमेल सध्या इच्छुक नेत्यांमध्ये सुरु झालीय आहे.

त्यानुसार प्रत्येक जण आपले पत्ते टाकताना दिसत आहे. परंतु यात जास्त चर्चा रंगते ती विखे यांची.मग ते खा. सुजय विखे असोत किंवा मंत्री राधाकृष्ण विखे असोत. सध्या सर्वानीच एकमेकांच्या विरोधात चंग बांधला आहे.

अंतर्गत वाद मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मात्र एकत्रच

जेव्हा विखे विरोधात कोल्हे अशा चर्चा रंगल्या तेव्हा विवेक कोल्हे यांनी हे सर्व खोटे आहे, दुसऱ्या पक्षात जाणार वगैरे या सर्व निरर्थक चर्चा आहे. आम्ही सर्व देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आणि पक्ष बळकट करण्याचे काम सुरू आहे असे ते म्हणाले.एकंदरीतच काय की, अंतर्गत वाद असले तरी मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मात्र एकत्रच आहेत असा यांचा अर्थ आपण घेतलेला बारा. बाकी सगळे समोर येईलच.

अहमदनगर लाईव्ह 24