अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात पुढच्या महिन्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असलेल्या कुटुंबांना गव्हासोबत मकाही दिली जाणार आहे.
मात्र मका हे आपले अन्न नसल्याने मकाचे प्रमाण कमी करून गहू देण्याची मागणी आमदार लहू कानडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मध्यंतरी सरकारने शेतकर्यांची मका खरेदी केली. तीच मका आता रेशनवर देण्याचा निर्णय सरकारने घेतला.
त्यानुसार जिल्ह्यातील श्रीरामपूरसह चार तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये मका देण्यात येणार आहे. याबाबत तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सांगितले की,अंत्योदय कार्ड धारकांना ३५ किलो धान्य दिले जाते. यात २ रुपये दराने २५ किलो गहू व ३ रुपये दराने १० किलो तांदूळ दिला जातो.
आता पुढील महिन्यात २५ किलो गव्हाऐवजी २० किलो मका व ५ किलो गहु व नेहमीप्रमाणे १० किलो तांदुळ याप्रमाणे ३५ किलो धान्य मिळणार आहे. तर प्राधान्य कुटूंब लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असलेले पिवळे व केसरी रेशनकार्डधारक यांना दरमहा मिळणार्या माणसी तीन किलो गहु व दोन किलो तांदुळऐवजी आता पुढच्या महिन्यात प्रतिमानसी दोन किलो
मका, एक किलो गहू व दोन किलो तांदुळ मिळणार आहे. आमदार कानडे यांना याबाबत समजताच त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांच्याशी संपर्क करून गहू देण्याची मागणी केली. ते म्हणाले, आपल्याकडील जनतेचे मका हे मुळ अन्न नाही. शिवाय तीच मका केवळ चारच तालुक्यात का द्यायची इतर तालुक्यांना का नाही?
अशी विचारणा करत अंत्योदय कार्डधारकांना २५ किलो धान्यातून २० किलो मका दिली तर तो ती खाऊ शकणार नाही. व त्यांची उपासमार होण्याची शक्यता आहे,
त्यामुळे प्रतिकुपन १० किलोपेक्षा अधिक मका कुणालाही देऊ नये व त्याऐवजी गहू देण्यात यावा, अशी मागणी आमदर कानडे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved