विरोधीपक्षनेते असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचे पाय धरले ! महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा विखे पाटलांना टोला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :   ते विरोधीपक्षनेते असताना त्यांना मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना आम्ही पाहिले आहे. त्यामुळॆ त्यांनी माझ्यावर टीका करू नये,असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना आज लगावला.

विखे पाटील यांनी काॅंग्रेस सत्तेसाठी लाचार आहे. काॅंग्रेसच्या मंत्र्यांना कोणी विचारीत नसून, सत्तेसाठी ऐवढे लाचार प्रदेशाध्यक्ष मी प्रथमच पाहिले, अशा शब्दांत थोरात यांच्यावर टीका केली होती.

या पार्श्वभूमीवर थोरात यांनी विखे पाटील यांच्यावर तोफ डागली. थोरात म्हणाले, पाच वर्षे विरोधी पक्षनेते असताना त्यांचे वागणे कसे होते, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांनी माझ्यावर केलेली टीका हि त्यांच्यासाठीच योग्य आहे.

त्यांना मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना आम्ही पाहिले आहे. असा टोला थोरात यांनी लगावला. दरम्यान, विखे पाटील व थोरात यांच्यातील राजकीय वैमनस्य महाराष्ट्राला माहित आहे.

निवडणुकीच्या काळात या दोन नेत्यांची जुगलबंदी कायम सुरू असते. यापूर्वी थोरात व विखे हे दोघेही काॅंग्रेसमध्ये होते. एकाच पक्षात असतानाही दोघांमध्ये राजकीय कुरबुरी होत असत.

मागील निवडणुकीच्या वेळी विखे पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर दोन्ही नेत्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. निवडणुकीच्या काळात तर एकमेकांवर टीकेची झोड उठविली होती.

शिर्डी व संगमनेर विधानसभा मतदारसंघात दोघेही एकमेकांविरोधात तगडे उमेदवार देतील, अशी शक्यता असताना अचानक त्यांच्यातील सूर जमले, आणि दोघांनीही विरोधात तगडे उमेदवार न देता अप्रत्यक्षरित्या एकमेकांना साथ देत दोघेही आमदार झाले.

आता मात्र थोरात सत्ताधारी पक्षात, तर विखे पाटील विरोधी पक्षात आहेत. त्यामुळे एकमेकांवर टीकेची झोड उठविण्यास कोणतीच संधी ते सोडत नाहीत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24