अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-रेखा जरे हत्याकांडामधील प्रमुख सूत्रधार म्हणून उघडकीस आलेला पत्रकार बाळ बोठे याला तत्काळ अटक करावी, त्यांच्या अवैध धंद्याची व संपत्तीची सखोल चौकशी व्हावी व सदर खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी केली आहे.
या मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांचा पुणे महामार्गावर सुप्या जवळील जातेगाव घाटात खून करण्यात आले.
या हत्याकांडात पत्रकार बाळ बोठे मुख्य सूत्रधार असल्याचे उघडकीस आले आहे. सध्या तो फरार असून, त्याला तत्काळ अटक करण्यात यावी, त्याने कोट्यवधी रुपयाची संपत्ती कोठून आणली? याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved