अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याचा पासपोर्ट पोलिसांनी त्याच्या घरातून जप्त केला. त्याने आतापर्यंत कोठे-कोठे विदेश प्रवास केला आहे, याची तपासणी पोलिसांनी केली.
त्यावरून काही धागेदोरे मिळतात का, याची चाचपणी केली जात आहे. दरम्यान यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे कारमधून नगरकडे येत असताना जातेगाव घाटात त्यांच्यावर दोघांनी सशस्त्र हल्ला केला.
हल्ल्यावेळी नेमकं काय घडलं? हा संपूर्ण घटनाक्रम त्यांच्याबरोबर कारमध्ये असलेल्या महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने यांनी रविवारी उलगडला. या घटनेने मला मोठा मानसिक धक्का बसला, म्हणून मी फोन बंद ठेवले होते.
माझी आईदेखील घाबरली होती. मी फरार वगैरे झाले नाही. मी महिला व बालविकास अधिकारी आहे. मी अनेक महिलांना व बालकांना न्याय देते, पण या घटनेनंतर मला भीती वाटत असल्याने पोलिस संरक्षण मिळावे, अशी विनंती करणार आहे, असे माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved