अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-जानेवारी महिना संपत आला तरी तालुक्यात कुकडीचे आवर्तन अद्याप आलेले नाही.
खरे पाहता कुकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असताना व कुकडीच्या चाऱ्या असलेल्या भागात पाण्याची गरज असताना अद्याप आवर्तन का आले नाही? असा प्रश्न उपस्थित करत पवारांची पॉवर आता कुठे गेली असा सवाल माजी मंत्री राम शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
तालुक्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, मका खरेदी केंद्र मध्ये देखील सर्वसामान्य शेतकऱ्यांची बनवाबनवी झाली आहे. तुर खरेदी केंद्राचा देखील शेतकऱ्याला फायदा झालेला नाही. यासह अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही.
तालुक्यातील रस्ते केंद्र सरकार यांनी मंजूर केलेले असताना व यासाठी दोन वर्षापासून आम्ही प्रयत्न केलेले आहेत. मात्र एखाद्या वेळी भेट घेऊन हे रस्ते आपणच प्रयत्नातुन आणली असताना त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्लाही प्राध्यापक शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना दिला.
तालुक्यातील कर्जत कूळधरण सह इतर रस्त्याचे काम निकृष्ट होत असताना, त्याची चौकशी होत नाही असा प्रश्नही उपस्थित केला आहे.