कोण झाले आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच ? वाचा इथे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-आदर्श गाव हिवरे बाजार ता.जि.अहमदनगर येथील ग्रामपंचायतची सरपंच उपसरपंच निवडणूक बिनविरोध पार पडली असल्याची माहिती निवडणूक अध्यासी अधिकारी श्री.तोरडमल ए.एफ.यांनी दिली.

यावेळी सरपंचपदासाठी सौ.विमल दिपक ठाणगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला.त्यास सूचक म्हणून सौ.रंजना राजू पवार तर उपसरपंच पदासाठी श्री.पोपटराव भागुजी पवार यांचा एकमेव अर्ज आला त्यांच्या नावाची सूचना श्री.रोहिदास नामदेव पादीर यांनी केली.त्यास सदस्य श्री.विठल भाऊ ठाणगे,

श्री.रोहिदास नामदेव पादीर, सौ.रंजना राजू पवार सौ.मीना संदीप गुंजाळ ,सौ.सुरेखा बना पादीर या सदस्यांनी पाठींबा दिल्याने या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. यावेळी हरिभाऊ ठाणगे सर ,

एस.टी.पादीर सर, अर्जुन पवार ,रामभाऊ चत्तर , बन्शी ठाणगे, सीताराम भालेकर ,सहदेव पवार गुरुजी,छबूराव ठाणगे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24