आमदार लंके यांनी का केली कुकडी डाव्या कालव्याची पाहणी ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पारनेर :- आमदार नीलेश लंके यांनी आज कुकडी डावा कालव्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर, कुकडी प्रकल्प नारायणगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी सुहास साळवे यांच्या सोबत बैठक घेऊन पाणी प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा केली.

आमदार लंके यांच्या सुचनेनुसार दि. 27 रोजी अधिकाऱ्यांनी पारनेर तालुक्यातील जनतेकरीता पाण्याचे आवर्तन सोडले असून हे पाणी व्यवस्थीत शेतकऱ्यांना मिळते की नाही याची चौकशी करण्यासाठी आमदार लंके यांनी कुकडी कालव्याला भेट दिली.

निघोज व परिसरात तसेच पारनेर तालुक्यातील कुकडी पट्ट्यात सध्या पाणीटंचाई जाणवू लागली असून कुकडी प्रकल्पाअंतर्गत पाण्याची परस्थीती व अधिकाऱ्यांचे पाणी सोडण्याचे नियोजन काय आहे त्याबाबत आमदार लंके यांनी या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत माहिती घेतली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24