अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची दिलखुलास मुलाखत घेतली असून या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
दी इनसायडर या यूट्यूब चॅनलसाठी पत्रकार राजू परुळेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत फडणवीस यांनी अनेक बाबींवर आपली भूमिका स्पष्ट केली.
या मुलाखती मध्ये सुजय विखे पाटील यांना अहमदनगर मधून लोकसभेची उमेदवारी का दिली? या प्रश्नावर फडणवीस यांनी थेट उत्तर दिले आहे.
या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले ”अहमदनगरमधील भाजपचे तत्कालीन खासदार दिलीप गांधी यांचं काम चांगलं होतं. त्यांनी मेहनतही भरपूर केली.
पण आम्ही जे सर्वेक्षण केलं त्यात अँटी इन्कम्बन्सी आढळली. त्यामुळे आपण काही बदल करावं, असा आमचा विचार होता. अहमदनगरमध्ये उमेदवारीसाठी काही नावे होती.
ती नावे असताना राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या मुलाने लोकसभेसाठी जवळपास चार वर्षे मेहनत घेतली होती. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews