अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- नेवासा तालुक्यात शेतातील व घरातील काम नीट येत नाही म्हणून पतीने शारिरीक व मानसिक त्रास दिल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना १० मे रोजी सकाळी आठ वाजता घडली.
याबाबत नेवासा पोलिसांनी दिलेली माहिती अशी : उज्ज्वला हिचा १५ वर्षांपूर्वी बाबासाहेब जनार्दन कापसे (रा.लंघे शिरसगाव, ता. नेवासा) याच्याशी विवाह झाला होता.
उज्ज्वला सासरी नांदणेस गेल्यापासून तिला शेतातील व घरातील काम नीट येत नाही म्हणून पतीने छळ सुरू केला. दि. १ मे रोजी सायंकाळी सात वाजता उज्ज्वला हिचा भाऊ देविदास गणगे (रा. गळनिंब सुरेगाव, ता.नेवासा) हा तिला भेटण्यासाठी लंघे शिरसगाव येथे गेला असता उज्ज्वला व तिचा पती बाबासाहेब यांच्यात भांडणे सुरू होती.
त्यावेळी उज्ज्वलाने सांगितले की, माझा नवरा मला घरगुती व शेतीतील काम येत नाही म्हणून नेहमी शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करत असतो. तेव्हा देविदास यांनी बाबासाहेब यास समजावून सांगितले.
त्यानंतर दि. १० मे रोजी सकाळी नऊ वाजता देविदास यांना बाबासाहेब याचा फोन आला. त्याने उज्ज्वला हिने विषारी औषध घेतले असून तिला शेवगाव येथे दाखल केल्याचे सांगितले.
देविदास यांनी आईसह शेवगाव येथील रुग्णालयात धाव घेतली. तेव्हा उज्ज्वलाची परिस्थिती गंभीर असल्याने तिला अहमदनगर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचार सुरू असताना दि. १४ मे रोजी सायंकाळी पाच वाजता तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी देविदास गणगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पतीने घरकाम येत नसल्याने बहिण उज्ज्वला हिला शारीरिक व मानसिक त्रास दिला.
त्यामुळे तिने दि. १० मे रोजी विषारी औषध पिवून आत्महत्या केली. याप्रकरणी नेवासा पोलिसांनी पती बाबासाहेब कापसे याच्याविरूद्ध भा.दं.वि. कलम ३०६, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com