अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- एकीकडे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आता त्याचे लोण ग्रामीण भागातही पोहोचले आहे नगर तालुक्यातील घोसपुरी या गावात ८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण गाव कन्टेन्मेंट झोन जाहीर केले आहे.
सोमवारी गावातील एक व्यक्ती कोरोनाबाधीत आढळून आला होता. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे स्राव नमुने घेतल्यानंतर त्याच्या घरातील दोघांसह संपर्कातील एक असे आणखी तीन व्यक्ती कोरोनाबाधित आढळले.
त्यानंतर गावातीलच एक व्यक्ती, त्याची पत्नी व मुलाने दोन दिवसापुर्वी खासगी लॅबमध्ये स्राव तपासणीसाठी दिले होते. बुधवारी (दि.१५) रात्री उशिरा या तिघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.
जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेने चास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी रश्मी शिंदे यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली.
त्यानंतर गुरुवारी (दि.१६) सकाळी सारोळा कासार आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्याधिकारी डॉ. सुविधा धामणे, आरोग्य सेविका इंदूमती गोडसे, वर्षा धामणे,
आरोग्यसेवक राजाराम वाबळे यांच्यासह पथकाने घोसपुरी येथे जात त्यांच्या संपर्कातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तातडीने सुरू केले आहे.
संपुर्ण गाव कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले असून गावात आरोग्य विभागामार्फत औषध फवारणी व इतर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
तसेच परिसरातील सारोळा कासार, खडकी, बाबुर्डीबेंद, हिवरेझरे, अस्तगाव आदी गावांमधील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews