अकोले :- तालुक्यातील गंथला घाट परिसरात डोंगरगाव भागात एक २५ वर्षाची तरुणी घरात एकटी असताना आरोपी गोविंद गंगाधर मधे, रा. मुधवळे, ता. अकोले, कचरू संतु गारले, रा. घोडसरवाडी, ता. अकोले हे दोघे तरुणीच्या घरात घुसले व तिला धरुन पाणी मागत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून विनयभंग केला.
तू जर आम्हाला विरोध केला तर तुला मारुन टाकू, अशी धमकी दिली. यावेळी आरोपी बाळूभाई पाटील, रा. घोडसरवाडी ता. अकोले हा घराबाहेर उभा होता. दुपारी ४:३० वाजता हा प्रकार घडला.
पिडीत तरुणीने अकोले तालुक्यातील फिर्याद दिल्यावरुन गोविंद मधे, कचरू गारले, व बाळूभाई पाटील या तिघांविरुद्ध विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हेकॉ सय्यद हे पुढील तपास करीत आहेत.