विहिरीत उडी मारून महिलेची आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- राहुरीच्या मोमीन आखाडा परिसरातील ३५ वर्षीय महिलेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

शारदा विजय शिंदे असे मृत महिलेचे नाव आहे. शारदा रात्री घरात झोपली होती. सकाळी ती घरात नसल्याचे लक्षात आल्यावर कुटुंबातील सदस्यांनी परिसरात शोध घेतला.

घरापासून काही अंतरावरील अप्पासाहेब तनपुरे यांची विहिरीत शारदाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी परिसरातील तरुणांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24