श्रीगोंदा : मूळचे पैठण तालुक्यातील दिनापूर येथील रहिवासी असणारी व सध्या श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथे राहणारी महिला काशीबाई सोमनाथ शिंदे वय ३०हिचा आंघोळीसाठी गेली असता घोडनदीपात्रात पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला.
ही घटना दि.२४ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेबाबत सोमनाथ शिंदे याने बेलवंडी पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सोमनाथ शिंदे हे पैठण तालुक्यातील दिनापूर गावचे रहिवासी आहेत. परंतु ते सध्या श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथे वीटभट्टीवर कामाला आहेत.
काल दि.२४ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मयत काशीबाई शिंदे ही महिला राजापूर शिवारातील घोडनदीपात्रात आंघोळीसाठी गेली होती. त्यावेळी नदीत आंघोळ करताना पाण्यात पडून बुडून या महिलेचा मृत्यू झाल्याची खबर सोमनाथ शिंदे याने दिली आहे.