डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने महिलेचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर :- कोल्हार-घोटी महामार्गावरील समनापूर चौफुलीवर खड्ड्यांमुळे ॲक्टिवावर बसलेली महिला खाली पडली.

ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजता घडली.

कवठे कमळेश्वर येथे राहणाऱ्या कमल लहू राजभोज (५०) नवीन ॲक्टिवावरून नातेवाईकासमवेत संगमनेर येथे बाजारासाठी जात होत्या.

कोल्हार-घोटी महामार्गावर समनापूर चौफुली येथे खड्ड्यात दुचाकी आदळून त्या खाली पडल्या.

पाठीमागून राजहंस दुधाचा ट्रक (एमएच १७ टी ३९८२) येत होता. ट्रकचे चाक महिलेच्या डोक्यावरून गेल्याने ती जागीच ठार झाली.

या अपघाताची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24