ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू,पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmadnagar Braking : कोपरगाव शहरातील बेट नाक्याजवळील नगर-मनमाड रस्त्यावर राजेंद्र रमेश सोळके हे आपल्या आईसोबत मोटारसायकलने एमएच १७ बीएन ४१६३ ने कोपरगाव-शिर्डी रस्त्यावरील संत लग्नाला जात होते.

त्यावेळी मागून येणाऱ्या एमएच १४ एएस ७२७५ या ट्रकने मोटारसायकलने राजेंद्र सोळके यांच्या मोटारसायकलला धडक दिली. यात सुमन रमेश सोळके या ट्रॅकच्या मागील चाकाखाली आल्याने त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, राजेंद्र सोळके हे बाजूला पडल्याने जखमी झाले.

दरम्यान, माजी आमदार स्नेहलता कोल्हे या रस्त्यावरून जाताना अपघात स्थळावरून पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली. अपघातात जखमी राजेंद्र सोळके यांनी धीर देत रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्याची व्यवस्था केली.

अनेक वर्षांपासून नगर-मनमाड रस्त्याची अवस्था दयनीय झाली असल्याने अनेक निवेदन आंदोलन केल्यानंतर या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, हे काम संथगतीने चालू असल्याने रस्त्याचे काम होणे असून अडचण नसून खोळंबा असे झाले.

या रस्त्यावर अनेक अपघात होऊन अपघातात अनेकांचा मृत्यू झाला, अनेकांना अपंगत्व आले. शासन अजून किती बळीची वाट पाहणार? आता तरी कामाची गती वाढवून काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

मृत सुमन रमेश सोळके हे शेतकरी सेवा संघाचे संचालक रामदास शिंदे यांच्या भगिनी असून संजीवनी एज्युकेशनचे विश्वस्त अमित कोल्हे यांचे विश्वासू विजय सोळके यांच्या आई होत. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Ahmednagarlive24 Office