अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर : श्रीरामपूर तालक्यातील पढेगाव येथील रतन सखदेव पवार, वय ६० वर्ष या महिलेच्या पोटात काहीतरी विषारी औषध गेल्याने तिला आत्मामलिक हॉस्पिटल कोकमठाण, कोपरगाव येथे उपचारासाठी जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
तेथे उपचार सुरू असताना ७ जानेवारीच्या रात्री रतन सुखदेव पवार या महिलेचा मृत्यू झाला.
आत्मा मलिक हॉस्पिटल कोकमठाण येथील डॉक्टरांनी काल शिर्डी पोलिसात खबर दिल्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून रतन पवार या महिलेच्या पोटात नेमके कोणते विषारी गेले? याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हे पण वाचा :- डोळ्यांना दिसतील अशीच कामे करायचीत रोहित पवारांची राम शिंदे यांच्यावर टीका !