अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरासह आता ग्रामीण भागात देखल कोरोना रुग्ण आढळत आहेत.
बुधवारी कोरोनावर उपचार सुुरू असताना नगर येथे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 9 झाली आहे.
तर काल श्रीरामपूर तालुक्यात नव्याने 15 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने कोरोनाबाधितांची संख्या 331 वर जाऊन पोहोचली असल्याची माहिती श्रीरामपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.
सदरची महिला ही उत्सव मंगल कार्यालय परिसरात राहत असून तिला मंगळवारी त्रास जाणवू लागल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र तपासणीदरम्यान तिच्यात कोरोनाची काही लक्षणे आढळून आल्याने तिच्यावर उपचार सुरू केले मात्र तिची तब्येत पहाता तिला तातडीने नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
काल तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या महिलेचा मुलगा येथील ग्रामीण रुग्णालयात सेवेत आहे काल आंबेडकर वसतिगृहातील कोरोना सेंटरमध्ये रॅपीड टेस्ट करण्यात आल्या.
काल 69 रॅपीड टेस्ट करण्यात आल्या त्यापैकी 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 54 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.
संतलूक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या 71 जणांपैकी 23 जणांंना बरे वाटत असल्यामुळे घरी सोडण्यात आले. त्यामुळे 48 जणांवर संत लूक मध्ये उपचार सुरु आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved