अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- आईच प्रेम काय असतं हे या बातमीचे हेडलाईन वाचून तुम्हाला कळालेच असेल.स्वताच्या मुलांना एका वेळेचे जेवण देण्यासाठी या माउलीने चक्क स्वताच्या डोक्यावरील केलं कापून विकले आहेत…
IndiaTimes ने दिलेल्या वृत्तानुसार महिलेने चिमुकल्यांसाठी केस कापून मिळवलेल्या पैशात जेवण विकत घेतलं. तामिळनाडू राज्यातील सेलममध्ये ही घटना घडली. पोटचा गोळा भुकेनं व्याकूळ असेल तर आईची अवस्था काय होत असेल याची कल्पनाही न केलेली बरी.
मुलांसाठी जेवण आणायला या महिलेकडे पैसेच नव्हते. त्यामुळे तिने मुलांचं पोट भरण्यासाठी चक्क केस विकण्याचा निर्णय घेतला. डोक्यावरचे सगळे केस तिने 150 रुपयांत विकले. प्रेमा असं या महिलेचं नाव आहे.
प्रेमा नावाची एका साधारण घरात राहते. मुलं भूकेमुळे व्याकुळ झाली होती. मात्र त्यांना जेवण देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. काय करावं असा प्रश्न प्रेमा यांना सतावत होता. तेवढ्यात तिथून एक केस खरेदी करणाऱ्याचा आवाज त्यांच्या कानी पडला. त्यांनी घराच्या बाहेर धाव घेतली आणि केस खरेदी करणाऱ्याला बोलावलं.
डोक्यावरचे केस खरेदी करणार का असं प्रेमा यांनी त्यांना विचारलं. त्यानंतर केसांचा सौदा 150 रुपयांत झाला. 150 रुपये घेऊन या विक्रेत्याने प्रेमा यांच्या डोक्यावरचे केस काढले. मिळालेल्या पैशातून प्रेमा यांनी मुलांसाठी जेवण विकत घेतलं आहे.