अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- नेवासे तालुक्यातील खडकाफाटा येथे झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. पोलीस पाटील सुभाष अंबादास भांगे (वयः 40 वर्षे) यांनी दिलेल्या
फिर्यादीनुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून सदर घटना दि.5 ऑक्टोबर रोजी सांयकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भांगे हे इंडीयन ऑईल पेट्रोल पंपावर चालले असताना त्यांना खबर मिळाली कि खडका टोलनाकाला जवळील औरंगाबादकडे जाणारे हायवे जवळ पुला जवळ मोटार अपघात झाला असुन
सदर अपघातात एक स्त्री जखमी झाली आहे. सदर ठिकाणी पाहणी केली असता तीच्या डोक्यावरुन अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने डोक्याचा चेंदा झाला होता. सदर महीला जागीच मयत झालेली होती अशी फिर्याद त्यांनी दिलेली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved