ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी ! प्रकृती चिंताजनक, परिसरात भितीचे वातावरण

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmadnagar Breaking : श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज (दत्तवाडी) येते शनिवार दि.९ रोजी पहाटे घराच्या बाहेर पढवीत झोपलेल्या यमुनाबाई नानासाहेब शिंदे या वृध्द महिलेवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मागील आठ दिवसात बिबट्याने दुसऱ्यांदा हल्ला केल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यातील अजनुज येथील दत्तवाडी परिसरात घराच्या बाहेर पढवीमध्ये झोपलेल्या यमुनाबाई शिंदे यांच्यावर शनिवारी पहाटे अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून तोंडाचा चावा घेतला.

पाळीव कुत्र्यांनी मोठं मोठ्याने भुंकण्यास सुरुवात केल्याने घरात झोपलेले महादेव व हौसराव यांनी बाहेर धाव घेत पाहणी केली असता यमुनाबाई यांना बिबट्याने धरलेले दिसले.

त्यावेळी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. घटनेनंतर ग्रामपंचायत सदस्य भानुदास कवडे यांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांच्या वाहनात जखमी महिलेस श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र वृद्ध महिला गंभीर जखमी असल्याने प्राथमिक उपचार करत पुढील उपचारासाठी नगर येथे सिव्हिल हॉस्पिटल दाखल केले. या आगोदर आठ दिवसापूर्वी अजनुज मोरेवाडीमध्ये अशी घटना घडली होती यामध्ये भागचंद शांताराम जाधव हा तरुण गंभीर जख्मी झाला आहे.

घडलेल्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. यामुळे वनविभागाने यांची गांभीर्याने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. पाऊस लांबल्याने शेतातील पिकांना पाणी नाही.

आणि आता घोडचे आवर्तन सुटल्यामुळे शेतकरी वर्ग हा रात्रीचा शेतावर असल्यामुळे पाणी देण्यासाठी घाबरत असुन, झालेल्या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

Ahmednagarlive24 Office