अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- पाथर्डी तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय येथील धायतडकवाडी येथील एका वयोवृद्ध महिलेचा मृतदेह वन विभागाच्या डोंगरात आढळून आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सोमवारी सकाळी अकोले-करोडी रोडवरील जगदंबा वस्ती येथे एक महिलेचा मृतदेह आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली.
या महिलेची ओळख पटली असून द्रौपताबाई निवृत्ती धायताडक (वय ७०) अशी तिचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार महिलेच्या बाजूला असलेल्या औषधांच्या बाटल्या आढळून आल्याने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.