अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरेजवळील जवाहरवाडी येथील शेतमजूर वृद्धा ट्रॅक्टरखाली चिरडली गेल्याने ठार झाली.
बबनबाई किसन गढवे असे तिचे नाव आहे. टिळकनगरलगत शेतकऱ्याने दोन एकर कांदा लागवड केली होती.
जवाहरवाडी परिसरातील बारा शेतमजूर महिलांची टोळी कांदा वाहतुकीचे काम करायला गेली होती.
दुपारी तीनच्या सुमारास काही महिला ट्रॅक्टरच्या मागील बाजूने, तर काही पुढील बाजूने कांदा ट्रॅक्टर ट्रॉलीत टाकत होत्या.
संबंधित वृद्धा आपल्या मुलीसह ट्रॅक्टरच्या पुढील बाजूस होती. चालकाने ट्रॅक्टर चालू केल्याने समोर असलेली वृद्धा चिरडली गेली.
तिच्या मागे मुलगा, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com