अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अकोले :- ती शहरातील असू द्या नाहीतर खेड्यात, ती कोणत्याही समाजाची नाही, तर वयाची असू द्या, ती शिक्षित नाही, तर अशिक्षित असू द्या, महाराष्ट्रात महिला कोठेही सुरक्षित राहिलेल्या नाहीत.
याला ठाकरे सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार आहे, अशी टीका भाजपच्या सोशल मीडियाचे प्रदेश संयोजक प्रवीण अलई यांनी केली.
जागतिक महिला दिनी अकोले तालुक्यातील गर्दणी येथील खानापूर परिसरातल्या गरीब व भोळासर स्वभावाच्या आदिवासी समाजाच्या युवतीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला.
पीडित युवतीच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी व त्यांना आधार देण्यासाठी अलई आले होते. या संदर्भात त्यांनी घटनास्थळी व पीडिताच्या घरी भेट दिली.
त्यानंतर त्यांनी अकोले पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित व निरीक्षक अरविंद जोंधळे यांची भेट घेऊन तपासाची माहिती घेतली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com