ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : मराठा आरक्षण समर्थनार्थ महिला सरपंचाचा राजीनामा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmadnagar breaking : मराठा आरक्षण समर्थनार्थ जामखेड तालुक्यातील सोनेगावच्या सरपंच सौ. रुपाली पद्माकर बिरंगळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यात अपयशी ठरलेल्या सरकारचा आणि सर्वच राजकीय पक्षांचा जाहीर निषेध करत संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी सरपंच सौ. रुपाली बिरंगळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

मराठा समाजातील युवकांची पात्रता असतानाही आरक्षणाअभावी शिक्षणात आणि शासकीय नोकरीत होणारे नुकसान ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे, सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजाचा फक्त मतदानासाठी वापर करतात,

मराठा समाजातील तरुणांची हतबलता बघुन मन व्यथित होतं, अशा परिस्थितीत सरपंचपदावर राहणे मनाला वेदनादायक ठरत असल्याने सरपंच पदाचा राजीनाम दिला असल्याचे सौ. बिरंगळ यांनी सांगितले आहे. मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेपर्यंत कुठल्याही राजकीय पदावर राहणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

Ahmednagarlive24 Office