अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. यात संगमनेर तालुक्यातील रुग्ण सर्वाधिक आहेत.
विविध शासकीय कार्यालयांत कोरोनाने एंट्री केल्यानंतर आता पोलीस यंत्रणेलादेखील कोरोनाने आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली आहे.
संगमनेरमध्ये ४ पोलिसांना बाधा झाल्याची घटना ताजी असतानाच आता संगमनेर शहर पोलिस स्टेशनच्या आणखी ८ पोलिसांचे अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याने पोलिस वर्तुळात धास्तीचे वातावरण पसरले आहे.
जवळपास १२ पोलिस कर्मचाऱ्यांना बाधा झाल्याचे रॅपिड टेस्टमधून पुढे आले आहे. काल संगमनेर तालुक्यात एकंदरीत ३० अहवाल पोहिटीव्ह आले आहे.
शहरातील इंदिरानगरमध्ये (४), जमजम कॉलनी, मालदाड रोड (प्रत्येकी ३), अकोले नाका, अकोले रोड, नवीन नगर रोड, घास बाजार (प्रत्येकी १) तर तालुक्यातील घुलेवाडी (८), आंबी खालसा (४), निंभाळे (२), कोल्हेवाडी, कनोली (प्रत्येकी १) यांचा यात समावेश आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com