अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे.
जामखेडमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश मिळाले होते. परंतु लॉक डाऊन उठल्यानंतर पुन्हा जामखेडमध्ये कोरोना रुग्ण वाढले जात आहेत.
जामखेड तालुक्यात कोरोना बाधिताची रूग्णांची संख्या 200 च्या घरात गेली आहे. तालुक्यातील खर्डा गावात रुग्णांची संख्या जास्त वाढू लागल्याचे चित्र आहे.
काल केलेल्या 75 जणांच्या रॅपिड अँटिजेन तपासणीत 13 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 62 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
शहरातील ग्रामीण रुग्णालय अंतर्गत आरोळे हाॅस्पिटल येथे रॅपिड अँटिजेन तपासणी सुरू करण्यात आली. काल आढळलेल्या 13 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये खर्डा येथील 8 रत्नापूर 1, झिक्री 1,
जामखेड शहरातील शिवाजी नगर येथे 2, बीड रोड येथे 1 आदी रुग्णांचा समावेश आहे. या ठिकाणी विविध उपाययोजना प्रशासनाने कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved