अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. दहा हजारांचा आकडा रुग्णसंख्येने पार केला आहे. ग्रामीण भागांत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर हे प्रमाण जास्त वाढले.
याला कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. मागील काही आठवड्यांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आता नव्याने पुन्हा ३३ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.
तर 7 जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. काल पॉझिटिव्ह आलेल्या ३३ रुग्णांमध्ये कोपरगाव शहरातील सप्तर्षी मळा येथील 43 वर्षीय पुरुष, गजानन नगर येथील 35 वर्षीय पुरुष,
सुभद्रा नगर येथील ५० वर्षीय पुरुष, टिळक नगर येथील 42, वर्षीय 9, वर्षीय व 67 वर्षीय अशा तीन महिला, बँक रोड येथील 44 वर्षीय पुरुष, संजीवनी परिसरातील 47 वर्षीय पुरुष,
खडकी 59 वर्षीय पुरुष, निवारा 27 पुरुष तर 75 वर्षीय महिला, धारणगाव रोड येथील 53 वर्षीय पुरुष तर 45 वर्षीय महिला,दत्तनगर येथील 25 वर्षीय पुरुष, गांधीनगर येथील 42 वर्षीय पुरुष, विवेकानंदनगर 60,3 वर्षीय महिला,
टाकळी रोड 84 वर्षीय महिला, कुलस्वामिनी समोर 33 वर्षीय पुरुष, तर25 व 68 वर्षीय महिला, राम मंदिर 56 वर्षीय पुरुष, पोलीस वसाहत येथील 47, 19 वर्षीय पुरुष तर 87 वर्षीय महिला,
यशवंत चौक येथील 43, 40 वर्षीय पुरुष तर तालुक्यातील देर्डे येथील 74 वर्षीय पुरुष, शाहजापूर – 1, ब्राह्मणगाव येथील 27 वर्षीय पुरुष, सुरेगाव येथील 55 वर्षीय महिला, जेऊर कुंभारी येथील 37 वर्षीय महिला, असे एकूण 32 तर नाशिक येथील एक आदींचा समावेश आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved