शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार – आ. कानडे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते व नेते मंडळींनी मला साथ दिली आणि त्याला मतदारराजानेदेखील पसंती दिली. शेतकरी व सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून मी मतदारसंघात कामे करणार आहे. 

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास आपण प्राधान्य देऊ, असे श्रीरामपूरचे नवनिर्वाचित आमदार लहू कानडे यांनी सांगितले. आमदार कानडे व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी शनिवारपासून आपला दौरा सुरू केला.

कानडे आणि ससाणे यांनी रामपूर, कोल्हार, चिंचोली, गंगापूर, पिपळगाव फुनगी, दवणगाव, संक्रापूर, आंबी, केसापूर, चांदेगाव, ब्राह्मणगाव भांड, करजगाव, जातप, त्रिंबकपूर, लाख आदी ठिकाणी भेट देऊन मतदारांशी संवाद साधला.

आमदार कानडे म्हणाले, कोणत्याही गट-तट, पक्ष यांचा विचार न करता आपण मतदारसंघात विकासकामे करणार आहोत. अवकाळी पावसाने बळीराजा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे प्राधान्याने त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष ठेवून राहणार आहे. गाव पातळीवर रमाई आवास योजना यासारख्या घरकुल योजनेचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.

जी संधी दिली आहे, त्या संधीचा उपयोग मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी मुळा-प्रवराचे उपाध्यक्ष जी. के. पाटील, युवा नेते ज्ञानेश्वर मुरकुटे, राहुरी काँग्रेसचे अध्यक्ष आढाव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे आदींची भाषणे झाली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24