होय ! आपले अहमदनगर आता कोरोनामुक्त होतेय …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 :- अहमदनगरमधील दोन कोरोना बाधित असलेल्या रुग्णांचा १४ दिवसानंतरचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना हॉस्पिटल देखरेखीखाली ठेवणार आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबिकर यांनी ही माहिती दिली

जिल्ह्यामध्ये ११ मार्च रोजी दुबईहून आलेल्या एका डॉक्टराला या संसर्गजन्य आजाराची लागणं झाली होती. त्यानंतर बाधीताचा आकडा वाढत तब्बल ३१ पर्यंत पोहचला.

त्यामध्ये ६ पॉझिटिव्ह हे दिल्लीमधील मरकजच्या कार्यक्रमातुन आलेले असून त्यांच्या संपर्कात आलेले जिल्ह्यातील २० कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते तर इतर ५ असे एकूण ३१ बाधितांची संख्या झाली होती.

मात्र डॉक्टर, नर्सेस, पोलीस आणि यांना मार्गदर्शन करणारे जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या विरोधात चालू केलेल्या लढाईला सर्व अहमदनगरकरांनी सहकार्य केले.

यामुळे आज ३१ वरुन बाधीतांची संख्या ११ वर आली असून २० जणांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.आठ कोरोनाबाधीत रुग्ण उपचार घेत आहेत.तर तिघांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत 1409 व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 1310 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

अजून 54 अहवालाची प्रतीक्षा आहे.तर काही अहवाल प्रयोगशाळेने फेटाळून लावले होते. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 31 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर यापूर्वी 18 व आता आणखी दोन असे एकूण 20 रूग्ण बरे झाले आहेत. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24