तरुण शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : शेततळ्याची मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या २७ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. अजय रामदास कुदनर असे मृताचे नाव आहे.

ही घटना मंगळवारी सकाळी ६ वाजता संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथे घडली. सकाळी ६ च्या सुमारास वीज जाणार असल्याने अजय शेततळ्याची मोटार सुरू करण्यासाठी गेला होता.

पाय घसरून तो शेततळ्यात पडला.बराच वेळ घरी न आल्याने कुटुंबाने त्याचा शोध घेतला असता तो मृतावस्थेत शेततळ्यात आढळून आला. दोन महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24