अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे सापडलेला कोरोनाचा पहिला रुग्ण बरा झाला आहे. मुंबई चेंबूर १७ मे रोजी तो मामाच्या गावी आला.
२२ मे रोजी त्याला कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे निदान झाले होते.राहुरीत पहिला कोरोना रुग्ण तो होता. तालुका प्रशासनाने वेळीच दखल घेतली.
तो प्राथमिक शाळेत क्वारंटाइन असताना त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते.
नगर येथील बूथ हाॅस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. सोमवारी (१ जून) कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले असून तो आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये आणखी दहा दिवस ठेवले जाणार आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews