विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या युवकास अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तालुक्यातील गुंजाळवाडी येथील युवकावर अत्याचार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

नीलेश देशमुख (कृष्णानगर, विडी कामगार सोसायटी, गुंजाळवाडी) याला २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

या तरुणाने खांडगावच्या २८ वर्षीय विवाहितेशी ओळख वाढवत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले. विवाहितेने मंगळवारी शहर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ नुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल करून तरूणाला अटक करण्यात आली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24