अहमदनगर :- नेवासा तालुक्यातील इमामपूर येथे एका युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता उघडकीस आली.
अजीनाथ बाळासाहेब काळे (वय २९) असे सदर आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.राहत्या घरातील छताच्या लाकडी ओंडक्याला साडी बांधून त्याने गळफास घेतला.
आत्महत्या केलेल्या युवकाच्या वडीलांनी घटनेची माहिती कामगार पोलीस पाटील सुधाकर काळे यांना शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता दिली. त्यानंतर गळफास घेतलेल्या युवकास पुढील तपासणीसाठी नेवासा फाटा येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले.
तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी युवकास मृत घोषित केले. इमामपूरचे कामगार पोलीस पाटील यांच्या खबरीवरून नेवासा पोलीस स्टेशन मध्ये सदर घटनेची भा. दं. वि. कलम १७४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®