अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- नगर-औरंगाबाद रस्त्यावर लिलियम पार्कजवळ झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला. याबाबत जखमी अनिकेत संजय वाघमारे (२०) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी अनिकेत वाघमारे त्याचा मित्र तुषार साळवे व फिर्यादीचे मामा असे शनिशिंगणापूर येथे जात असताना
कारचालकाच्या डोळ्यावर अचानक समोरील कारचा प्रकाशझोत आल्याने कारचालक तुषार याने गाडीचा ब्रेक दाबल्याने गाडी रस्त्याच्या खाली गेली.
वाहन अविचाराने चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तुषार सुनील साळवे (रा. बाराबाभळी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.