लग्नास नकार दिल्याने तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- होणाऱ्या नवऱ्याने अपशकुनी हिनवत साखरपुड्यानतंर लग्नास नकार दिला. यामुळे भारती भास्कर सांगळे (२६, हंगेवाडी, ता. संगमनेर) हिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

ही घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी आश्वी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला. भारती यांचा सागर अर्जुन सानप (मुंबई) यांच्याशी विवाह ठरला होता. ३० जूनला साखरपुडा झाला.

मुलीच्या परिवाराने एक तोळे सोन्याची अंगठी व दोन लाख रुपये रोख दिले. मुलाने दोन तोळे सोन्याचे नेकलेस व कानातील दागिने दिले. साखरपुड्यानंतर सागरने मुुलीच्या मंडळींशी चांगले संबंध प्रस्थापित केले.

साखर पुड्यात दिलेले दागिने व्यवस्थित करतो, असे सांगून दागिने लांबवले. सागरने भारतीला फोन करत तुझ्या घरचे अपशकुनी असल्याने विवाह मोडल्याचे सागितले.

या धक्क्याने भारतीने पांडुरंग सांगळे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. किरण भास्कर सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर सानप,

अर्जुन सानप, सुजाता सानप, स्नेहा आव्हाड (नेहरुनगर, कुर्ला ईस्ट, मुंबई) या चौघांवर आश्वी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे व अपहाराचा गुन्हा दाखल केला. तपास पीएसआय नयन पाटील करत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24