सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथे पुणे – नगर महामार्गावरील हॉटेल कुणालसमोर झालेल्या मोटारसायकल अपघातात पायल प्रशांत माळवे (वय -२३ रा. हुडको कॉलनी शिरुर जि.पुणे) यांचा मृत्यू झाला.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.२३ रोजी दत्तात्रय मधुकर काजळे (रा .अकोले जि.अहमदनगर) यांच्या मोटारसायकलवर पायल प्रशांत माळवे ही डबलशीट शिरूरकडे जात असताना सुप्या जवळ अचानक कुत्रे आडवे आल्याने ब्रेक मारला असता.
मोटारसायकल स्लीप होऊन दोघेही दुचाकीवरून पडले यात पायल माळवे हिच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला, तर काजळे हा देखील जखमी झाला.
त्यास उपचारासाठी शिरूर येथे दाखल केले. याबाबत स्वप्निल किशोर माळवे (वय -२९ रा.प्रितमप्रकाश नगर, शिरूर जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरून मोटारसायकलचालक काजळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.