सौंदर्यवतीच्या बोलण्याला भुलला आणि हेरगिरी करून सैन्यदलांची संवेदनशील माहिती दिली, अखेर पोलिसांनी केली अटक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- एका सौंदर्यवतीच्या हनीट्रॅपमध्ये फसलेल्या जम्मू-काश्मीरमधील एका व्यक्तीला मंगळवारी अटक करण्यात आली.

राकेशकुमार असे या व्यक्तीचे नाव असून सुरक्षा तळांची हेरगिरी करून त्यासंदर्भातील माहिती पाकिस्तानी युवतीला माहिती तो पुरवीत होता.

पाक सीमेलगतच्या अर्निया गावाचा रहिवासी असलेला राकेश फेसबूकच्या माध्यमातून एका पाकिस्तानी युवतीच्या संपर्कात आला.

हा हनिट्रॅप होता. म्हणजेच या युवतीने राकेशला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याला भारतीय सुरक्षा दलांच्या हालचाली, सैन्यतळांची माहिती देण्यास सांगितले.

आणि युवतीच्या प्रेमात आकंठ बुडालेला राकेश सैन्यदलांची संवेदनशील माहिती तिला पुरवत होता. गुप्तचर यंत्रणांना त्याचा संशय आल्याने ते राकेशवर लक्ष ठेवून होते.

अखेर मंगळवारी त्याला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून राकेशकुमारची चौकशी करण्यात येत आहे.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24