ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग ! मराठा आरक्षणासाठी संगमनेरमधील तरुणाची आत्महत्या

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking : मराठा आंदोलनाचे लोन महाराष्ट्रभर पसरले आहे. ग्रामीण भागातही लोक आंदोलन करत आहेत. कालपासून आंदोलनाने हिसंक वळण घेतले आहे.

तर काही ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. आता अहमदनगर मधून एक बातमी आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील युवकाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे.

संगमनेर तालुक्यातील झोळे येथील तरूणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली. मंगळवारी दि.( ३१) ऑक्टोबर रोजी पहाटे ही घटना घडली. एक मराठा लाख मराठा असा उल्लेख चिठ्ठीत करत त्याने गळफास घेतला. सागर भाऊसाहेब वाळे वय (२५) असे मृत युवकाचे नाव आहे.

समजलेली माहिती अशी : सागर वाळे हा युवक संगमनेर येथे कार्यरत आहे. सोमवारी रात्री घरातील सर्व झोपल्यानंतर मंगळवारी पहाटे सागर घराच्या पाठीमागे असलेल्या शेडमध्ये गेला. तेथे त्याने गळफास घेतला. त्याठिकाणी एक वही सापडली आहे. त्यात ”आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे. कोणाला जबाबदार धरू नये,. एक मराठा लाख मराठा, आपला लाडका सागर मराठा” असे उल्लेख केलेला आहे. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत एकच गर्दी केली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे व पोलीस कर्मचाऱ्यांनी तरुणाचा मृतदेह खाली घेतला. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सरकार आणखी किती लोकांचा जीव घेणार आहे असा रोष नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.

अहमदनगर सह अनेक जिल्ह्यात आत्महत्या करण्याच्या घटना घडल्या आहेत. तरुणांनी इतके टोकाचे पाऊल उचलू नये, आत्महत्या करून जीवन संपवू नये असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा संघटनांनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office