युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांचे बँकेच्या दारात आंदोलन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : शेतक-यांना बँकेने शेती पिक कर्ज लवकर अदा करावे या मागणीसाठी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांनी भाजपा पदाधिका-यांच्या उपस्थितीत कोळगांव येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, च्या शाखेसमोर समोर आंदोलन केले.

खरीप हंगाम सुरु झाला आहे.शेतक-यांना नवीन बियाणे, खते खरेदीसाठी पैसे नाहीत, पैसे नसल्याने त्यांनी कर्जासाठी बँकांकडे अर्ज केले आहेत मात्र अजूनही बँकांनी शेतक-यांना कर्ज दिलेले नाही.

बँकांनी लवकरत लवकर पिक कर्ज मंजूर करून कर्जाचे पैसे शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करावेत अशी मागणी विक्रमसिंह पाचपुते यांचे सह भाजपा पदाधिका-यांनी केली.

तसेच बँकांनी या आंदोलनाची दखल न घेतल्यास पुन्हा आंदोलन छेडले जाईल असा इशारा ही यावेळी आंदोलकांच्या वतीने देण्यात आला. तसेच यावेळी मा.पंतप्रधानांचे संदेश पत्र युवा नेते विक्रमसिंह पाचपुते व भाजपा पदाधिका-यांच्या हस्ते नागरिकांना देण्यात आले.

सदरचे आंदोलन कोरोना प्रादुर्भावामुळे योग्य ती दखल घेऊन करण्यात आले. यावेळी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांचे सोबत भाजपचे तालुक्काध्यक्ष संदीप नागवडे, माजी सभापती पुरुषोत्तम उर्फ भैय्या लगड, सौ.वैजयंतीताई लगड, नितीन नलगे , उमेश बोरुडे, संग्राम लगड, इत्यादी पदाधिकारी उपस्थितीत होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24