BSNL 4G :  देशात 5G सेवा सुरू झाली आहे. प्रमुख दूरसंचार कंपन्या Airtel आणि Jio ने देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. आता सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) देशात 4G सेवा आणण्याच्या तयारीत आहे.

लवकरच BSNL आपले 4G नेटवर्क सुरू करू शकते. कंपनी पुढील वर्षी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये 4G नेटवर्क लॉन्च करू शकते अशी अपेक्षा आहे. याआधी BSNL ची 4G सेवा या वर्षी नोव्हेंबरमध्ये आणि 5G नेटवर्क पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती.

इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC 2022) मध्ये, BSNL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पीके पुरवार यांनी सांगितले की कंपनी पुढील 18 महिन्यांत सुमारे 1.25 लाख 4G मोबाइल साइट्स लॉन्च करण्याची योजना आखत आहे.

नोव्हेंबरपर्यंत 4G नेटवर्क सुरू करण्याची योजना आहे. BSNL 4G आणि 5G साठी TCS सारख्या मोठ्या कंपन्यांशी बोलणी करत आहे. IMC मध्ये, BSNL ने त्यांच्या 4G आणि 5G नेटवर्कचा रोडमॅप देखील सादर केला आहे.

खरं तर, BSNL च्या 4G सेवेच्या लॉन्च संदर्भात, एका वापरकर्त्याने BSNL India टॅग केले आणि कंपनीला विचारले की BSNL चे 4G नेटवर्क कधी सुरू होईल. त्यानंतर कंपनीनेही युजरला उत्तर दिले. कंपनीने 4G लॉन्चची तारीख जाहीर केली नसली तरी कंपनीने सांगितले की BSNL ला 4G लायसन्स रिव्हायव्हल पॅकेजमध्ये मिळाले आहे. यासोबतच स्वदेशी उपकरणांचा पुरवठाही करण्यात येत आहे. आम्ही लवकरच अपग्रेड केलेली इंटरनेट सेवा सुरू करू.

15 ऑगस्टला 5G सेवा सुरू होणार असल्याचे आयटी मंत्री म्हणाले होते

आयटी आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही बीएसएनएलच्या 5जी सेवेबाबत मोठी घोषणा केली आहे. BSNL ची 5G सेवा 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू होईल, असे केंद्रीय मंत्री म्हणाले होते. ते म्हणाले की, बीएसएनएलच्या 5जी सेवेबाबत सातत्याने काम सुरू असून ही सेवा वेळेवर सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

हे पण वाचा :- Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक ! 5 वर्षात मिळणार 14 लाखांपेक्षा जास्त पैसे ; जाणून घ्या कसं