BSNL Plan : सरकारी (Government) दूरसंचार कंपनी BSNL ने 2022 च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एक नवीन फायबर ब्रॉडबँड योजना (fiber broadband plan) सादर केली होती . या फायबर ब्रॉडबँड योजनेची किंमत 275 रुपये आहे जी 1 महिन्याच्या वैधतेसह येते.

फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 60 Mbps स्पीडवर 3300GB (3.3TB) पर्यंत डेटा एक्सेस मिळतो. डेटा कोटा म्हणजेच फेअर यूसेज पॉलिसी (FUP) मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 2Mbps पर्यंत घसरतो.

ही एक अतिशय परवडणारी ऑफर आहे, आणि BSNL सेवा वापरून पाहू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ही एक उत्तम ऑफर आहे. ही एक प्रमोशनल योजना असल्याने, ती मर्यादित काळासाठी आली होती . आता BSNL ने या ऑफरची एक्सपायरी डेट उघड केली आहे. ही योजना कधी संपेल ते जाणून घ्या.

BSNL चा 275 रुपयांचा फायबर ब्रॉडबँड प्लान या दिवशी होणार बंद

BSNL चा 275 रुपयांचा फायबर ब्रॉडबँड प्लॅन दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही पर्याय 75 दिवसांच्या वैधतेसह येतात आणि 3.3TB डेटा आणि एक निश्चित लाइन व्हॉइस कॉलिंग कनेक्शन ऑफर करतात.

महिन्याचा FUP डेटा संपल्यानंतर, वेग 2 Mbps पर्यंत कमी केला जातो. दोन ऑफरमधील फरक असा आहे की एक रु. 275 प्लॅन 30 Mbps स्पीड ऑफर करतो आणि दुसरा 60 Mbps स्पीड ऑफर करतो.

टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, 275 रुपयांचे हे दोन्ही प्लान 13 ऑक्टोबर 2022 रोजी बंद होतील. याचा अर्थ जे ग्राहक 13 ऑक्टोबरनंतर प्लॅनसह रिचार्ज करू इच्छितात त्यांना हा प्लॅन मिळणार नाही. हा प्लॅन नवीन ग्राहकांसाठी तसेच विद्यमान ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. बीएसएनएलच्या 275 रुपयांचा फायबर ब्रॉडबँड प्लॅन बीएसएनएलच्या फायबर एंट्री प्लॅनपेक्षा अधिक परवडणारा आहे, ज्याची किंमत प्रति महिना 329 रुपये आहे आणि 1TB डेटा येतो.