Gold Price Today : देशात लग्नसराईच्या दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत आहेत. 10 नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याचे भाव स्थिर होते.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोन्याचा भाव 0.07 टक्क्यांनी वाढून 51,543 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 0.4 टक्क्यांनी वाढून 61,313 रुपये प्रति किलोवर पोहोचला.

देशांतर्गत बाजारात किंमत काय आहे?

गुड रिटर्न्सनुसार, गुरुवार, 10 नोव्हेंबर रोजी, 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 51,670 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची सरासरी किंमत 47,360 रुपये आहे.

एक किलो चांदी 61,400 रुपयांना खरेदी केली जाऊ शकते, जी बुधवारच्या किंमतीपेक्षा सुमारे 300 रुपये कमी आहे. अमेरिकन सरकारी रोख्यांवर परतावा कमी झाल्यामुळे गुरुवारी सोन्याचा भाव किरकोळ वाढून 51,670 रुपये झाला. गुरुवार, 10 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,670 रुपये आहे.

तुमच्या शहरातील आजचा दर किती आहे?

24 कॅरेट सोन्याचा दर पाहता मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा दर 51,670 रुपयांना होत आहे.
24 कॅरेट शुद्धतेचे 10 ग्रॅम सोने चेन्नईमध्ये 52,530 रुपयांना उपलब्ध आहे.
दिल्लीत 51,770 रुपयांना सोन्याची खरेदी-विक्री सुरू आहे.
हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 47,360 रुपये आहे.
हैदराबादमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,670 रुपये आहे.
बंगळुरूमध्ये 24 कॅरेट सोने 51,330 रुपयांना विकले जात आहे.
अहमदाबाद आणि सुरतमध्ये सोने 51,720 रुपयांना विकले जात आहे.
लखनौ आणि जयपूरमध्ये सोने 51,770 रुपयांना विकले जात आहे.
चंदीगडमध्येही आज 24 कॅरेट सोने 51770 रुपयांना विकले जात आहे.