Discount on Renault Cars : दिवाळीच्या मुहूर्तावर सर्व कार कंपन्यांनी आपल्या लोकप्रिय कार्सवर जबरदस्त डिस्काउंट दिले होते. अशातच दिवाळीनंतरही रेनॉल्टने त्यांच्या काही कार्सवर 35 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट जाहीर केले आहे.

त्यामुळे तुम्ही जर नवीन कार घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. कंपनी रेनॉल्टच्या कोणत्या कार्सवर डिस्काउंट देत आहे ते जाणून घेऊया.

Renault Kwid

नोव्हेंबर 2022 मध्ये, रेनॉल्टच्या छोट्या हॅचबॅक कार Kwid वर 30,000 रुपयांचे फायदे जाहीर करण्यात आले आहेत. कंपनीच्या वेबसाइटनुसार, निवडक व्हेरियंटवर रु. 10,000 ची रोख सवलत, कॉर्पोरेट सवलत रु. 10,000 आणि RXE वगळता सर्वांवर रु. 10,000 चे एक्सचेंज बोनस आहे. शेतकरी, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना पाच हजार रुपयांची सवलत दिली जात आहे. Kwid ची एक्स-शोरूम किंमत 4.64 लाख रुपयांपासून सुरू होते.

Renault Triber

नोव्हेंबर महिन्यात कंपनीच्या सात आसनी कारवर सर्वाधिक सूट देण्यात येत आहे. ही कार खरेदी केल्यास 35 हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. ऑफरनुसार, या कारच्या निवडक व्हेरियंटवर 10,000 रुपयांपर्यंत रोख सूट, 15,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बेनिफिट आणि 10,000 रुपयांपर्यंतचे कॉर्पोरेट फायदे दिले जात आहेत. शेतकरी, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना पाच हजार रुपयांची सवलत दिली जात आहे. सात सीटर MPV ट्रायबरची एक्स-शोरूम किंमत 5.91 लाख रुपयांपासून सुरू होते.

Renault kiger

Renault ची कॉम्पॅक्ट SUV, kiger वर देखील नोव्हेंबर महिन्यात सूट दिली जात आहे. एसयूव्हीला 10,000 रुपयांची एक्सचेंज कॉर्पोरेट सूट मिळत आहे. यासोबतच ग्रामीण भागात राहणारे शेतकरी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनाही पाच हजार रुपयांची ऑफर दिली जात आहे. Renault MPV ची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते.