अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- विरूध्द दिशेने आलेल्या कार चालकाने समोरून येणार्‍या दुचाकीस्वाराला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

बाळासाहेब सुखदेव सुरसे (रा. चितळी ता. पाथर्डी) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावरील पिंपळगाव लांडगा (ता. नगर) शिवारात भातोडी फाट्याजवळ हा अपघात झाला.

याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल चंद्रकांत गवळी (वय 28 रा. जवखेडे खालसा ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे.

बाळासाहेब सुरसे फिर्यादी गवळी यांची दुचाकी घेऊन पाथर्डीहून अहमदनगरकडे येत होते. भातोडी फाट्याजवळ अहमदनगरकडून पाथर्डीकडे जाणार्‍या कार चालकाने विरूध्द दिशेने कार चालवून सुरसे यांच्याकडील दुचाकीला धडक दिली. या धडकेत सुरसे जखमी झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक वनवे करीत आहे.